पुणे
वडगाव येथील आखाड्यात शंभराहून अधिक कुस्त्या निलावी
आळेफाटा, ता. १८ ः वडगाव आनंद (ता. जुन्नर) मोरदरा येथील गावचे ग्रामदैवत श्री कळमजाई मातेच्या यात्रेनिमित्ताने कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन केले होते. या ठिकाणी शेवटची निलावी कुस्ती अजिंक्य बाम्हणे (राहुरी) व सचिन साठे (पुणे) यांच्यात झाली. यामध्ये अजिंक्य याने बाजी मारली. यावेळी आखाड्यात शंभराहून अधिक निलावी कुस्त्या झाल्या. तसेच, दीड लाखांच्यावर बक्षीसे देण्यात आली. पंच म्हणून सुरेश काकडे यांनी काम पाहिले.
दरम्यान, कळमजाईमाता यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहात कार्तिक महाराज काकडे, प्रशांत महाराज कोटकर, कांचन जगताप, कविराज महाराज झावरे यांची कीर्तन सेवा झाली. तसेच, देवीची चोळी पातळ व भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
07348
