आळे येथे सुविधांअभावी पशुपालक त्रस्त
राजेश कणसे : सकाळ वृत्तसेवा
आळेफाटा, ता.२६ : आळे (ता.जुन्नर) येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोनचा दर्जा आहे. मात्र, येथील पशुपालकांना आवश्यक सुविधांअभावी गाई व म्हशींना बेल्हे किंवा पिंपळवंडी येथे घेऊन जावे लागते. त्यांचा पैसा व वेळेचा अपव्यय होत आहे. त्यामुळे पशुपालक त्रस्त झाले आहेत.
दवाखान्याला स्वतःच्या मालकीची जमीन नाही.
अनेक वर्ष साडे चार हजार पशुधनाला पशुवैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी जिथे पदवीधर पशुवैद्यक असला तरी या ठिकाणी श्रेणी एक दर्जाचा दवाखाना असणे गरजेचे आहे. या ठिकाणी सध्या सहायक पशुधन विकास अधिकारी व परिचर या पदावर कर्मचारी उपलब्ध असले तरी पशुधन विकास अधिकारी पद भरणे गरजेचे आहे.
यांची आहे गरज
- पशुधन विकास अधिकारी पद
- एक्स-रे मशिन
- आधुनिक प्रयोगशाळा
दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात एकूण आळे, कोळवाडी, संतवाडी, आळेफाटा ही चार गावे येतात. वर्षानुवर्षे उत्तम दुग्ध व्यवसाय असलेल्या या पंचक्रोशीत बावीस ते पंचवीस वर्षापासून मागणी असलेला दर्जा वाढीचे काम विभागाच्या पुनर्रचनेत पूर्ण झाले आहे. सद्यःस्थितीत दवाखान्याला स्वतःचे मालकीची जमीन नाही व जी इमारत आहे ती या ठिकाणी असलेल्या आळे दूध सहकारी संस्थेची असून येथील ग्रामपंचायतीने इमारतीसाठी बांधकाम बांधण्यासाठी गायरान क्षेत्रातील वीस गुंठे जागा आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने होण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे.
नोव्हेंबर २०२५ अखेरची स्थिती
उपचार...........७४५
कृत्रिम रेतने...........१२६
लसीकरण
लंपी.........४३२२
लाळ खुरकूत.........३९१४
कुक्कुट.........४७४
आंत्रविषार.........०
परिसरातील पशुधन
गाई..........४१६१
शेळ्या..........२७३
म्हशी..........८३
वार्षिक उपलब्ध चारा टनात
हिरवा.........९००
वाळलेला .........५०० ते ६००
कार्यक्षेत्रातील गाई म्हशींचे लसीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व पशुपालकांचे व्हॉट्सअप नंबर एकत्रित करून त्यांचे गावनिहाय ग्रुप बनवलेले आहेत. त्यानुसार वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन तसेच शासनाकडे असलेल्या विविध योजनांबाबत माहिती पुरवली जाते.
- डॉ. दत्तात्रेय लाड, सहायक पशुवैद्यकीय अधिकारी आळे
07373
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

