पाच गुंठ्यांतील घेवड्यातून ४० हजारांचा नफा
आळेफाटा, ता. २८ : आळे येथील येथील ज्ञानदेव बाम्हणे या शेतकऱ्याने अवघ्या पाच गुंठ्यांत घेवड्याचे पीक घेत ४० हजार रुपयांचा नफा मिळाला आहे.
आळे (ता.जुन्नर) येथील शेतकरी ज्ञानदेव बाम्हणे हे शेतकरी आपल्या छोट्या क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. या शेतात आधी मका होती. मका पीक काढून त्यांनी शेतात नांगरणी केली. ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटर मारून वाफे बनवले. गेल्या वर्षी त्यांनी पिकवलेल्या घेवड्याचे बी त्यांनी धरून ठेवले होते. घरातील जुने असलेले ३०० ग्रॅम बी त्यांनी आपल्या अवघ्या पाच गुंठ्यात लावले. या शेतकऱ्याने या पिकासाठी घरच्याघरी लाकडी पण मजबूत अशा तारा लावून मांडव केला. नंतर या पिकाचे जे वेल आहेत ते या तारांना बांधले. सुमारे दीड महिन्यांत हे पीक हाताशी आले. विशेष म्हणजे बाम्हणे यांनी या पिकाला पिकाला कोणत्याही प्रकारचे रासायनिक खताचा वापर केलेला नाही. सर्व पिकाला जैविक खताचा वापर केलेला आहे. त्यामुळे पीक अतिशय प्रकारे बहरले. बाम्हणे यांना आतापर्यंत सुमारे खते व बियाणे व मांडवासाठी लागणाऱ्या तारा यांचा एकूण खर्च १० हजार रुपये आला आहे. तसेच वेळोवेळी पिकाची त्यांनी काळजी घेतली. शेंगांची घरीच तोडणी केली. किलोला ६० ते ७० रुपये दराने त्यांनी आळेफाटा येथे घेवड्याच्या शेंगांची विक्री केली. आत्तापर्यंत त्यांनी ५० हजार रुपयांच्या शेंगा विकल्या आहेत. अवघ्या चार महिन्यांत त्यांना चार गुंठ्यामध्ये खर्च वजा करून ४० हजार रुपयांचा नफा मिळवला आहे. अजूनही २० ते २५ दिवस शेंगांची तोडणी सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
घेवडा हे असे पीक आहे की ते कमी खर्चात येऊन जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून ओळख आहे. शेतमाल शेतातून थेट बाजारात विकल्याने शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो. या वर्षी शेतात अनेक पिके घेतली पण सर्वांत फायदेशीर त्यांना घेवड्याचे पीक ठरले आहे. घेवडा ही फळभाजी असल्याने व आरोग्याच्या दृष्टीनेही भाजी चांगली असते.त्यामुळे बाजारात या चांगली मागणी आहे.विशेष करून हे पीक घेत असताना रासायनिक खतांचा वापर केला नाही फक्त शेणखताचा व जैविक खतांचा वापर करून हे पीक घेतल्याने झाडाची वाढ लवकर होऊन उत्पादनात फायदा झाला आहे.
- ज्ञानदेव बाम्हणे, घेवडा उत्पादक, आळे (ता. जुन्नर)
वर्षनिहाय बाजारभाव किलोमध्ये (रुपयांत)
२०२१ : ५५ ते ७५
२०२२ : ६० ते ८०
२०२३ : ५५ ते ७०
२०२४ : ६० ते ७०
7383
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

