बिबट्याच्या हल्ल्यात
जाधववाडीत महिला जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात जाधववाडीत महिला जखमी

Published on

आळेफाटा, ता. १ ः जाधववाडी (ता. जुन्नर) येथे एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी (ता. ३१) रात्री आठच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जाधववाडी येथील रतन माळी हे पत्नी आशा माळी यांच्या समवेत शनिवारी रात्री आठच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात असताना एका बिबट्याने आशा माळी यांच्यावर हल्ला करत त्यांच्या पायाला चावा घेत जखमी केले. अचानकपणे हल्ला झाल्याने मोठ्याने त्या ओरडल्यावर बिबट्याने काही क्षणात या ठिकाणाहून पळ काढला. आशा माळी यांच्यावर नारायणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केल्यानंतर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. घटनास्थळी वन विभागाच्या
वनपाल गणेश बागडे, वनरक्षक महेश जगधने व रेस्क्यू मेंबर्स यांनी भेट दिली.
दरम्यान आळेफाटा परिसरातील राजुरी, उंचखडक, जाधववाडी, बोरी बुद्रुक, बोरी खुर्द, आळे, कोळवाडी, सतवाडी, वडगाव आनंद, वडगाव कांदळी या परिसरात दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून या उसाची तोडणी सुरू असल्याने बिबट्यांना लपण क्षेत्र नसल्याने त्यांना ते मानवी वस्तीमध्ये येऊ लागले आहेत. त्यामुळे वनविभागाने या ठिकाणी पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com