जुन्नर तालुक्यात मुरघास ठरतोय पशूंसाठी वरदान

जुन्नर तालुक्यात मुरघास ठरतोय पशूंसाठी वरदान

Published on

आळेफाटा, ता. २ ः जुन्नर तालुक्यात दरवर्षी सुमारे ८० ते ९० हजार टन मुरघास बनवला जातो. दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी बहुधा मुरघास बनवताना दिसतात. तालुक्यातील सुमारे १ लाखांच्या वर जनावरे आहेत. या जनावरांना बदलून चारा देणे आवश्यक असते. काही शेतकऱ्यांकडे बारा महिने चारा उपलब्ध नसतो म्हणून ऐन वेळी हा मुरघास जनावरांना उपयुक्त ठरतो.
पावसाळ्यामध्ये कधीकधी दहा ते पंधरा दिवस लागून पाऊस असतो. त्यामुळे शेतामध्ये चारा आणायला जाता येत नाही. शेतात काहीही काम करता येत नाही अशा वेळी मुरघास पशू खाद्याचा उपयोग शेतकऱ्यांना होतो. काही शेतकरी विक्री करण्यासाठी मुरघास बनवतात. सध्या ६ ते ७ हजार रुपये टन या दराने मुरघासाची विक्री होते. एकंदर तालुक्यातील शेतकरी ४० ते ४५ कोटी रुपयांचा मुरघास जनावरांसाठी घरच्या घरी बनवतात.
तालुक्यातील शेतकरी मुरघास निर्मिती शास्त्रशुद्ध पद्धतीने करतात. मुरघास बनवण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, हत्तीगवत इत्यादींचा वापर करतात. तालुक्याच्या पूर्व भागात शेतकऱ्यांमध्ये मुरघास बनवण्याचे प्रमाण ८० ते ८५ टक्के आहे. हिरव्या चाऱ्यापासून नियंत्रित किण्वन प्रक्रियेचा वापर करून तयार करण्यात येणारे जास्त आद्रता असणारा पशू आहार म्हणजे मुरघास. मुरघासात कमीत कमी २० ते ४० टक्के शुष्क पदार्थ, १४ ते १६ टक्के क्रूड प्रोटिन्स असतात. हा मुरघास वर्षभर चांगल्या स्थितीत राहतो. मुरघास हा शेतकऱ्यांच्या कामाच्या वेळेत किंवा चाराटंचाई काळात जनावरांना खाद्य टाकण्यासाठीचा चारा म्हणून उपलब्ध होतो. शिवाय कमी जागेत जास्त चारा साठवून ठेवता येतो. सध्या जुन्नर तालुक्यात मुरघासासाठी लागणारी मका वाहतूकही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. काही शेतकरी ही मका विकत घेऊन यापासून मुरघास तयार करून ठेवतात. एकरी १० ते १३ हजार रुपये किमतीने मका विकत घेऊन शेतकरी जनावरांसाठी हा मुरघास बनवतात. या काळात मका उत्पादक शेतकऱ्याला मक्याच्या कणसाचे पैसे होतात तसेच कणसे काढल्यानंतर राहिलेली मका मुरघासासाठी विक्री करता येते.


तालुक्यात मुरघास बनवण्याचे प्रमाण प्रचंड असनू तालुक्याच्या पश्चिम भागात कमी प्रमाणात मुरघास बनवतात. अचानक दुष्काळ पडला किंवा पाणी टंचाईच्या काळात सुद्धा मुरघासाच्या माध्यमातून बाराही महिने हिरवा ओला व पौष्टिक चारा उपलब्ध होतो. मुरघासात तयार होणारे लॅक्‍टिक आम्ल हे गायी व म्हशीच्या पचनेंद्रियात तयार होणाऱ्या रसासारखे असते म्हणून मुरघास हा पचनात सोपा असतो. मुरघासामुळे जनावरांची भूक वाढते. त्यांच्या चयापचयात बिघाड होत नाही. त्यामुळे दुधाची गुणवत्ता व उत्पादन वाढण्यास मदत होते.
-संदीप औटी, मुरघास बनविणारे शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com