आळे येथे सायबर सेक्युरिटी, एआयवर कार्यशाळा
आळेफाटा, ता. ३ : आळे येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयात सायबर सिक्युरिटी व आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील गुणवत्ता सिद्धता कक्ष व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने सायबर सेक्युरिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून विद्यार्थी संबंध अधिकारी करण सावंत, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव डॉ. अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुळवले तसेच प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यशाळेस भारत केअर्स आणि अमेरिकन कंपनी हनीवेल यांच्या साहाय्याने सीएसआर (कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी) अंतर्गत आयोजित केली. भविष्याच्या संगणक क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्किल-बेस्ड शिक्षण देण्याच्या उद्देशाने हायब्रीड मोडमध्ये विविध तंत्रज्ञानाधारित कोर्सेस मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सायबर सेक्युरिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे महत्त्वाचे विषय प्रोजेक्ट-बेस्ड पद्धतीने शिकविले जाणार आहेत.
‘‘विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाविद्यालयाने भारत केअर्स आणि हनीवेल कंपनीसोबत पुढील तीन वर्षांसाठी सामंजस्य करार केला आहे,’’ अशी माहिती दिली. ही कार्यशाळा गुणवत्ता सिद्धता कक्ष प्रमुख मेजर डॉ. सुषमा कदम व विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख डॉ. संतोष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली. बीसीए आणि बीसीएस (कॉम्प्युटर सायन्स) विभाग प्रमुख प्रा. सर्जेराव थोरात यांनी आपल्या विभागासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

