आळे येथील केंद्राचे 
बारावी परिक्षेचे नियोजन पूर्ण

आळे येथील केंद्राचे बारावी परिक्षेचे नियोजन पूर्ण

Published on

आळेफाटा, ता. ५ ः आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षेच्या नियोजनाची बैठक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण पार पडले. या बैठकीत परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप भवारी व केंद्र संचालक सुरेश कुऱ्हाडे यांनी सांगितले.
बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरु होत असून आळे केंद्रात एकूण ८४० परीक्षार्थी असणार आहेत. या केंद्रावर ज्ञानमंदिर कनिष्ठ महाविद्यालय आळे, विद्या विकास मंदिर राजुरी, ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल, जे. आर. इंग्लिश मीडियम स्कूल, सद्‍गुरू सिताराम महाराज विद्यालय पिंपरी पेंढार आणि विद्यानिकेतन साकोरी येथील विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. उपकेंद्र संचालक म्हणून मच्छिंद्र लांडगे, बाबासाहेब खतोडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
कॉपीमुक्त, शांत व शिस्तप्रिय वातावरणात परीक्षा पार पाडणे ही या केंद्राची पहिल्यापासूनच ओळख आहे. केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व गैरप्रकार टाळण्यासाठी यावर्षी मंडळाकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात टेलिफोन, फॅक्स केंद्र, झेरॉक्स सेंटर, इंटरनेट सुविधा अथवा इतर संपर्क साधने बंद ठेवणे बंधनकारक आहे.
आज झालेल्या आढावा बैठकीत परीक्षेच्या कामकाजाचा आढावा घेऊन पर्यवेक्षकांनी घ्यावयाची काळजी यांबाबत उपप्राचार्य व केंद्र संचालक सुरेश कुऱ्हाडे यांनी माहिती दिली. या वेळी विद्या विकास मंदिर, राजुरीचे प्राचार्य जी. के. औटी व सद्‍गुरू सिताराम महाराज विद्यालय, पिंपरी-पेंढारचे प्राचार्य‌ बी. जी. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीच्या सभेचे सूत्रसंचालन उपकेंद्र संचालक मच्छिंद्र लांडगे यांनी केले. तर, वैभव फापाळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com