आळे येथील विद्यालयात कर्करोग जनजागृती
आळेफाटा, ता. ५ : रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन आणि सी क्युअर कॅन्सर हॉस्पिटल यांच्या वतीने आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानमंदिर विद्यालयात बुधवारी (ता. ४) जागतिक कर्करोग जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. तज्ज्ञ मार्गदर्शक कॅन्सर सर्जन डॉ. अमोल डुंबरे यांनी कर्करोगाच्या लवकर निदानाचे महत्त्व, उपलब्ध उपचार पद्धती आणि निरोगी जीवनशैली यांसह ग्रामीण भागात कर्करोगाविषयी जागरूकता वाढवणे, भीती दूर करणे आणि योग्य वेळी उपचार मिळवून देणे ही काळाची गरज आहे असे सांगितले. अशा जनजागृती उपक्रमांमुळे अनेकांचे जीव वाचू शकतात, तसेच लवकर तपासणी व योग्य उपचार यांमुळे कर्करोगावर मात शक्य आहे, असे सोप्या व प्रभावी पद्धतीने त्यांनी पटवून दिले. या कार्यक्रमाचे नियोजन रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेनचे अध्यक्ष प्रा. अमोल कापसे यांनी केले. प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

