ओतूरला मतदारांसाठी ग्रंथालयाची सोय
आळेफाटा, ता. ७ : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यात निवडणूक प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केले होते. यामध्ये मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. ज्येष्ठ व अपंग मतदारांसाठी व्हिलचेअरची सोय केली होती. अनेक मतदार केंद्रावर सेल्फी पॉइंट केला होता.
जुन्नर तालुक्यात बारव आणि ओतूर येथील मतदार केंद्र हे तालुक्यात आदर्श मतदार केंद्र बनले यामध्ये विशेष करून ओतूर या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष, विरंगुळा केंद्र, प्रतीक्षा रूम, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच जास्त गर्दी झाल्यास मतदारांना पुस्तके वाचण्यासाठी ग्रंथालय, केंद्रामध्ये फुगे लावण्यात आले होते. इतर सुलभ सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. तर बारव येथे निवडणूक विभागाकडून पिंक बूथ तयार करण्यात आले होते. या मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष सह सर्व कर्मचारी या महिला होत्या. तर ज्येष्ठ मतदारांना पोलिस स्वत: मतदारांना केंद्रात जाण्यासाठी मदत करत होते.
दरम्यान प्रशासनाच्या वतीने काही गावांमध्ये मतदानाच्या स्लिपा वाटण्यात आल्या. तर काही गावांमध्ये स्लिपा वाटल्या नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांना मतदारांची यादीत नावे शोधण्यास वेळ जात होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

