आळेफाटा बाजारात कांद्याला दहा किलोस १३० रुपये भाव

आळेफाटा बाजारात कांद्याला 
दहा किलोस १३० रुपये भाव
Published on

आळेफाटा, ता. १० : येथील उपबाजारात शुक्रवारी (ता. १०) कांद्याची आवक घटल्याने बाजारभावात किलोमागे दोन ते तीन रुपयांची वाढ झाली. एक नंबर गोळा कांद्याला १० किलोसाठी १३० रुपये बाजारभाव मिळाला असून, बाजारात एकूण ५ हजार ७१९ पिशव्यांची आवक झाली होती.
बाजारातील लिलावात दोन नंबर कांद्यास ११० ते १२० रुपये, तर गोल्टी कांद्यास ८० ते १०० रुपये बाजारभाव मिळाला. बदला व चिंगळी कांद्याचे भाव ३० ते ७० रुपयांच्या दरम्यान राहिले. गेल्या महिनाभरापासून अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवण्यावर भर दिला आहे. परिणामी, बाजारात आवक कमी होऊन दरात सुधारणा झाली आहे. मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात ६ ते १० रुपये आणि दुसऱ्या पंधरवड्यात ६ ते ९ रुपये प्रति किलो मिळणारा भाव एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात १० ते १२ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com