निमगाव सावा शाळेत
बाल आनंद मेळावा

निमगाव सावा शाळेत बाल आनंद मेळावा

Published on

बेल्हे, ता. ८ : निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतेच अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लहानग्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्यातून कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

निमगाव सावा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. शाळेचे
मुख्याध्यापक लहू गोफणे यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी उद्योजक विजय गाडगे यांनी या शाळेला ई-लर्निंगचा संच भेट दिला.

याप्रसंगी सरपंच किशोर घोडे, माजी सरपंच सुनीता घोडे, केंद्रप्रमुख श्रीमती काळे, नूतन शेगर, श्रीहरी भालेराव, सुनंदा गाडगे, परेश घोडे, जाकीर पटेल, भीमाजी खाडे, इरफान पटेल, गणेश थोरात, नजीर चौगुले, अशोक बांगर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सारिका पतसंस्थेच्या अध्यक्षा चंदा गाडगे, पंडित नेहरू विद्यालयाच्या प्राचार्या पौर्णिमा चव्हाण, तसेच चंद्रकांत जावळे, गणपत घोडे, विजय गाडगे यांनी मनोगत व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक लहू गोफणे यांच्यासह उपशिक्षक संतोष साळुंके, उपशिक्षिका शोभा गोंदके, जयश्री जावळे, शारदा मटाले, प्रशाली डुकरे, आशा चुकाटे, शाहिस्ता सय्यद आदींनी विशेष परिश्रम घेतले.
----------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.