बेल्हे येथे महिलांना भेटवस्तू वाटप
बेल्हे, ता. १५ : बेल्हे (ता. जुन्नर) येथे श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मकर संक्रांती निमित्त आयोजित पारंपरिक हळदी- कुंकू समारंभात महिला मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी झाल्या होत्या. यावेळी पतसंस्थेच्या वतीने महिलांना भेटवस्तू स्वरूपात वाण वाटप करण्यात आले.
बेल्हे येथे श्री साईकृपा पतसंस्थेच्या वतीने, दरवर्षी मकर संक्रांती निमित्त महिलांसाठी पारंपरिक हळदी- कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात येते. यावेळी पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झालेल्या महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सदाशिव बोरचटे व उपाध्यक्ष सावकार पिंगट यांनी, महिला वर्गाचे स्वागत करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी तुळशीराम महाराज सरकटे, रघुनाथ लेंडे, स्नेहल शेळके, लक्ष्मण मंडलिक, सुरेश महाराज बुट्टे, अशोक गुंजाळ, श्री साईकृपा पतसंस्थेचे सचिव अनिल गुंजाळ- पाटील, ठकसेन शिंदे, बाळासाहेब गुंजाळ, दत्तात्रेय गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संभेराव आदी उपस्थित होते.
यावेळी तुळशीराम महाराज सरकटे यांनी पतसंस्थेच्या विविध उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत, पतसंस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी पतसंस्थेच्या वतीने महिला वर्गास, तसेच सभासदांना तिळगुळ वाटप करण्यात आले.
02734

