
पारगाव येथील मातीनाला बांध खोलीकरण कामाचा प्रारंभ
पारगाव, ता.२ : पारगाव (ता.आंबेगाव) येथे आय.टी.सी. मिशन सुनहरा कल तसेच ग्रामपंचायत पारगाव यांच्या संयुक्तपणे गावांमध्ये मृदा व जलसंधारणांतर्गत सुमारे तीन लाख रुपये खर्च करून मातीनाला बांध खोलीकरणाच्या (गाळ काढण्याच्या) कामाचा प्रारंभ सरपंच बबन ढोबळे यांच्या हस्ते झाला.
याप्रसंगी माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, प्रकल्प अधिकारी सूरज गुप्ता, कृषी सहायक किरण सोंडकर, इंजिनिअर रमेश बारगजे, सतेज दातखिळे, चंद्रकांत शिरोळे, गणेश बोऱ्हाडे, खंडू बोऱ्हाडे, श्रीहरी बोऱ्हाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मातीनाला बांध खोलीकरणाच्या कामामुळे परिसरात ‘पाणी आडवा पाणी जिरवा’अंतर्गत माती नाला, ओढा खोलीकरण कामे चालू आहेत. नाल्यातील मातीचा उपयोग शेतात टाकण्यासाठी होणार आहे. तसेच पावसाचे पाणी जमिनीत जिरवल्यामुळे जमिनीतील पाणी पातळीत वाढ होणार आहे, असे ढोबळे यांनी सांगितले.