
भीमाशंकर साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी थिटे, कोकणे
पारगाव, ता. ९ : दत्तात्रेयनगर-पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी पोपटराव थिटे व गणेश कोकणे यांची निवड झाली.
याबाबत कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी माहिती दिली की, भीमाशंकर कारखान्याच्या सन २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी झालेल्या संचालक मंडळ निवडणुकीमध्ये १८ जागा बिनविरोध होऊन ३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक व माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधील उमेदवारांचा भरघोस मतांनी विजय झाला. वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत थिटे व कोकणे यांची निवड झाली.
थिटे हे प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी आहेत. भागडीचे सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. तसेच, आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संस्थेवर त्यांनी संचालक म्हणून काम केले आहे. युवा उद्योजक गणेश कोकणे हे महाळुंगे (सुपेधर) गावचे रहिवासी आहेत.