Wed, Feb 1, 2023

पारगाव येथील शाळेत २५० विद्यार्थ्यांचा सहभाग
पारगाव येथील शाळेत २५० विद्यार्थ्यांचा सहभाग
Published on : 22 January 2023, 9:41 am
पारगाव, ता. २२ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर शिक्षण संस्थेच्या डी. जी. वळसे पाटील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सकाळतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत एकूण २५० विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती प्राचार्या सोनल कानडे यांनी दिली.
ही स्पर्धा पहिली ते दहावीपर्यंतच्या चार वेगवेगळ्या वयोगटांमध्ये घेण्यात आली होती. या स्पर्धेत परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २२ विद्यार्थी व डी. जी. वळसे पाटील महाविद्यालयातील ८ विद्यार्थी आणि डी. जी. वळसे पाटील न्यू इंग्लिश स्कूलचे २२० विद्यार्थी असे एकूण २५० विद्यार्थी सहभागी झाले होती.
स्पर्धेची व्यवस्था प्राचार्या सोनल कानडे, कला शिक्षक अंकुश रोकडे, सहाशिक्षिका चित्रा बांगर, बाप्पाना सोमुत्ते, सोनाली वाबळे यांनी पाहिली.