धामणीकरांकडून आंदोलनाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामणीकरांकडून आंदोलनाचा इशारा
धामणीकरांकडून आंदोलनाचा इशारा

धामणीकरांकडून आंदोलनाचा इशारा

sakal_logo
By

पारगाव, ता. २५ : धामणी (ता. आंबेगाव) येथील बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा बंद करून ती जवळच्या शाखेत विलीन करण्याची प्रक्रिया बँकेने सुरू केल्याने बँक व्यवहाराबाबत गैरसोय होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. बँक विलीनीकरणाची प्रक्रिया तातडीने थांबवली नाही, तर पुणे येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य कार्यालयाबाहेर ग्रामस्थांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले यांनी निवेदनाद्वारे दिला.
आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील मोठ्या आणि आदर्श धामणी गावामध्ये सन १९७८ पासुन बँक ऑफ महाराष्ट्र कार्यरत आहे. शेतकरी, शालेय विद्यार्थी महिला बचत गट व्यवसायिक गोरगरीब जनतेला मुख्य आधार बँक ऑफ महाराष्ट्र आहे. परंतु, काही दिवसांपासून चर्चा सुरु झाली कि येथील बँक बंद होऊन ती जवळच्या शाखेत विलीन करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे बुधवारी करंजखेले यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पुणे येथील महाराष्ट्र बँकचे पुणे पश्चिम अंचल प्रबंधक राहुल वाघमारे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यांच्या समवेत माजी सरपंच सागर जाधव, ग्रामपंचायत सदस्य अक्षय विधाटे, खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके उपस्थित होते.
राहुल वाघमारे यावेळी शिष्टमंडळाशी संवाद साधताना म्हणाले, ‘‘लवकरच ग्रामस्थांसोबत मेळावा घेऊ व ग्रामस्थांच्या समस्या समजून घेऊन बँकेचा आर्थिकस्थर उंचावण्याचा प्रयत्न नक्कीच करू.’’ त्याचप्रमाणे बँक विलीनीकरण व करण्याबाबत त्यांनी आश्वस्त केले. तसेच नागरिकांच्या भावना वरिष्ठ कार्यालयाला कळवू, असे सांगितले.