अलोट गर्दीने फुलला खंडोबा मंदिर परिसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अलोट गर्दीने फुलला खंडोबा मंदिर परिसर
अलोट गर्दीने फुलला खंडोबा मंदिर परिसर

अलोट गर्दीने फुलला खंडोबा मंदिर परिसर

sakal_logo
By

पारगाव, ता. ६ : धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवाच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही (ता. ६) मंदिर परिसर भाविकांच्या अलोट गर्दीने फुलून गेला होता. देवाच्या मानाच्या काठ्यांची पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढून त्या मंदिराच्या शिखराला लावण्यात आल्या.

दरवर्षी मुंबई-पुणेसह नगर जिल्ह्यातून लाखो भाविक धामणीच्या खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येतात. अनेक भाविकांचे कुलदैवत असलेल्या खंडोबा मंदिराच्या आवारात जागरणाचे कार्यक्रम केले जातात, असे वाघेवीर मंडळींनी यावेळी सांगितले. देवकार्याचे जागरण करण्यासाठी भाविकांनी व नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी गर्दी केली होती.

मंदिर परिसरात पारगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे व पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खंडोबाच्या मानाच्या काठीचे मानकरी राजगुरू मंडळी (अवसरी खुर्द) यांच्या वतीने पारंपारिक वाद्यांच्या गजरात काठीची मिरवणुक काढून शिखराला लावण्यात आली.

काल यात्रेच्या पहिल्या दिवशी भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, शिरूर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, सुनील बाणखेले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, जिल्हा संघटक अविनाश रहाणे, तालुका प्रमुख दिलीप पवळे यांनी यात्रेला भेट देऊन भाविकांना शुभेच्छा दिल्या.
-------------------