वडगाव पीर येथे १६ लाखांची वीजचोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगाव पीर येथे १६ लाखांची वीजचोरी
वडगाव पीर येथे १६ लाखांची वीजचोरी

वडगाव पीर येथे १६ लाखांची वीजचोरी

sakal_logo
By

पारगाव, ता. १० : वडगाव पीर (ता. आंबेगाव) येथे चोरून वीज वापरून नऊ महिन्यात ९४ हजार ४५७ युनिटची वीजचोरी करणारे योगेश सत्यवान आदक (रा. वडगाव पीर) यांच्या विरोधात पारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकातील विशाल बाळकृष्ण कोष्टी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वडगाव पीर गावच्या हद्दीत गट नंबर ३६४ मध्ये १ मे २०२२ ते १८ जानेवारी २०२३ यादरम्यान वीज चोरीचा प्रकार घडला आहे. योगेश आदक यांनी मागील नऊ महिन्यात ९४ हजार ४५७ युनिटची वीजचोरी केली आहे. त्याद्वारे महावितरण कंपनीचे १६ लाख ८३ हजार ८६८ रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. त्यांच्याकडे तपासणीवेळी ४४.७५ के डब्ल्यू जोडभार आढळून आला. वीज बिलावरील मंजूर भार १७० एचपी असून, त्याची तडजोड रक्कम १७ लाख रुपये एवढे होते. वीजचोरी केल्याबाबत योगेश आदक यांच्या विरुद्ध भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक जठर करीत आहे.