काठापूर बुद्रुक येथे १७० बैलगाडे धावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काठापूर बुद्रुक येथे १७० बैलगाडे धावले
काठापूर बुद्रुक येथे १७० बैलगाडे धावले

काठापूर बुद्रुक येथे १७० बैलगाडे धावले

sakal_logo
By

पारगाव, ता. १९ : काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यात रोशनकुमार निवृत्ती करंडे यांच्या बैलगाड्याने घाटाचा राजा किताब पटकाविला. शर्यतीमध्ये एकूण १७० बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला.
यावेळी पहिल्यामध्ये फळीफोड सुशांत सदाशिव रोडे (पोंदेवाडी), दुसऱ्यात प्रथम किशोर काळुराम करंडे (काठापूर बुद्रुक), तिसऱ्यात प्रथम कपिल पांडुरंग विश्वासराव (थोरांदळे), चौथ्यात प्रथम अरुण नितीन पाचारणे (लाखणगाव) हे बैलगाडे आले. तर फायनल शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक पांडुरंग आनंदा सोनवणे (शिंगवे), दुसरा क्रमांक दिवंगत सचिन सूर्यकांत भंडलकर (राजगुरुनगर), तृतीय क्रमांक हर्षल नंदुशेठ कोकणे सावता महाराज बैलगाडा संघटना यांचे बैलगाडे आले. उत्सवामध्ये एकूण ८५ हजार रुपये ईनामाचे बैलगाडा मालकांना वाटप करण्यात आले. सरपंच अशोक करंडे, उपसरपंच विशाल करंडे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष मंगेश करंडे, उपाध्यक्ष कमलेश नरवडे, राहुल भुरके, अशोक जोरी, लक्ष्मण करंडे, संतोष करंडे, किशोर करंडे, काळूराम टिंगरे, सागर हुले, नवनाथ लोंढे तसेच ग्रामस्थांनी महत्त्वाचे जबाबदारी पार पाडली. यात्रेनिमित्त भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे, माऊली आस्वारे, पोपट थिटे यांनी भेट दिली. घाटाचे उद्‍घाटन नंदू कोकणे, एकनाथ मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पारगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे व पारगाव पोलिस स्टेशनच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.