वडगावपीरच्या सहा वर्षीय भार्गवचा स्केटिंगमध्ये डंका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगावपीरच्या सहा वर्षीय भार्गवचा स्केटिंगमध्ये डंका
वडगावपीरच्या सहा वर्षीय भार्गवचा स्केटिंगमध्ये डंका

वडगावपीरच्या सहा वर्षीय भार्गवचा स्केटिंगमध्ये डंका

sakal_logo
By

पारगाव, ता. ९ : वडगावपीर (ता. आंबेगाव) येथील सहा वर्षांच्या भार्गव विजय राजगुडे याने बेंगलोर येथे सलग ९६ तास स्केटिंग करण्याचा आणि सगळ्यात मोठे अक्षर बनवण्याच्या विश्व विक्रम केला. त्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली व विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र भार्गवला नुकतेच प्रदान करण्यात आले. याबद्दल त्याचे स्तरातून कौतुक होत आहे.
भार्गवने स्केटिंग क्रीडा प्रकारात राज्य तसेच देश पातळीवरील अनेक स्पर्धात पदके जिंकली आहेत. विजय रामजी राजगुडे व स्वाती राजगुडे यांचा चिरंजीव भार्गव हा पुणे येथील विबाग्योर शाळेत पहिलीमध्ये शिकत आहे. राजगुडे हे कॉम्पुटर इंजिनियर असून पुण्यातील मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे. भार्गवचा स्केटिंग खेळाकडे असणारा कल ओळखून त्यांनी भार्गवला स्केटिंगच्या कोर्सला प्रवेश घेतला. त्याचे आई-वडील पहाटे चार वाजता उठून सरावासाठी त्याला घेऊन जातात. यामुळे भार्गवने मेहनत घेत त्यात प्रावीण्य मिळवले.

काही महिन्यापूर्वी बेळगाव येथे झालेल्या विश्वविक्रममध्ये भार्गव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ९६ तास सलग स्केटिंग कारण्याचा आणि सगळ्यात मोठे अक्षर बनवण्याचा विश्वविक्रम २९ मे ते १ जून २०२२ दरम्यान केला होता. त्याचे प्रमाणपत्र त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेकडून नुकतेच प्राप्त झाले आहे. आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख अरुण गिरे यांनी भार्गव याची भेट घेऊन त्याने मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
भार्गवने गेल्या वर्षभरात तीन नॅशनल स्पर्धा (रूरल गेम्स ऑरगनाजशन ऑफ इंडिया, मिशन ऑलम्पिक, इंडुरंस नॅशनल चॅलेंज या राष्ट्रीय स्पर्धा मध्ये सहभागी) जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर पात्रता मध्ये प्रथम तीन क्रमांकाच्या आत त्याने पदक जिंकले आहे. दरम्यान, भार्गवची खेळामधील प्रगती पाहून विबाग्योर शाळेने त्याला वार्षिक खेळामध्ये मशालवाहक होण्याचा मान दिला.

02186, 02185