
वडगावपीर येथे यात्रेनिमित्त नैवद्याची सवाद्य मिरवणुक
पारगाव, ता. १५ : हिंदू-मुस्लिम भाविकांच्या ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या वडगावपीर (ता. आंबेगाव) येथील श्री पीरसाहेब (हजरत दावल मलिक पीर दर्गा शरिफ) यात्रेनिमित्त राज्यभरातून आलेल्या हिंदू-मुस्लिम भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
यात्रेनिमित्त मंगळवारी (ता. १४) रात्री संदलचा कार्यक्रम झाला. भाविकांनी पारंपरिक पद्धतीने वाद्याच्या गजरात संदलची मिरवणुक काढून देवास अर्पण केले. बुधवारी सकाळपासून परिसरातील भाविकांनी देवाला अर्पण करण्यात येणाऱ्या फुलांची चादर आणि मलिदा व गोडभाताच्या नैवद्याची वाजत गाजत मिरवणुक काढून देवास अर्पण केले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी दर्गा परिसरात रांगा लावल्या होत्या
मुजावर जमात आणि गावातील सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते, मांदळवाडी व वडगावपीर ग्रामस्थांनी यात्रेची व्यवस्था पाहिली. गुरुवारी दुपारी तीन वाजता कुस्त्यांचा आखाडा होणार आहे.