पहाडदरा परिसराला गारपिटीचा तडाखा

पहाडदरा परिसराला गारपिटीचा तडाखा

पारगाव, ता. १०: आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील पहाडदरा परिसराला रविवारी (ता.९) सायंकाळी मुसळधार पावसासह गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसला. यामुळे रस्त्यावर, शेतात, गोठ्यात, घराच्या अंगणात गारांचा अक्षरशः खच पडला होता. गारांच्या माऱ्याने शेतातील कांदा, उन्हाळी बाजरी, मका, हिरवा चारा भुईसपाट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ढगांच्या गडगडाटासह सायंकाळी जोरदार पावसासह मोठ मोठ्या गारा पडू लागल्या. गारांच्या तडाख्यामुळे शेतात काढून ठेवलेला कांद्यास मोठा फटका बसला. शेतातील उन्हाळी बाजरी, मका, गहू, जनावरांचा हिरवा चारा शेतातच भुईसपाट झाला. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान, शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ, अजय कुरकुटे, सोसायटी अध्यक्ष मच्छिंद्र वाघ, संतोष कुरकुटे, पप्पू कुरकुटे, विलास पडवळ यांनी केली आहे.

02377, 02376, 02379

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com