सुभद्रा यांच्या गोडीशेव, बुंदीची चवच न्यारी

सुभद्रा यांच्या गोडीशेव, बुंदीची चवच न्यारी

पारगाव, ता. १० : गावची यात्रा म्हटलं की गोडी शेव, भजी, जिलेबी, शेव चिवडा या पदार्थांची हॉटेलमध्ये रेलचेल असते यात्रेतील पदार्थांची चवही भारीच असते. यात्रेकरूही या पदार्थावर मस्त ताव मारत असतात आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक गावच्या सुभद्रा वामनराव हिंगे ऊर्फ ताई या ८० वर्षाच्या आज्जी आजही स्वत:च्या हाताने गोडीशेव, बुंदी, शेव चिवडा, जिलेबी, भजी बनवतात त्यांच्या हातच्या पदार्थांची गोडी चाखण्यासाठी यात्रेकरूंची पावले त्यांच्या हॉटेलकडे आपोआप वळतात गेल्या ६० वर्षांपासून त्या हॉटेल व्यवसाय सांभाळत आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यात ग्रामदैवतांच्या यात्रा उत्सवांना सुरुवात झाली आहे. यात्रेमध्ये खाद्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर दुकाने लागलेली असतात यात्रेत मिळणारी गोडीशेव, शेव रेवडी, भजी, जिलेबी यांची चव भारीच असते. यात्रा आठवड्यावर आली की हॉटेलमधून येणाऱ्या पदार्थांचा घमघमाट लक्ष वेधून घेतो. हॉटेलमध्ये हे सर्व पदार्थ बनविण्याची लगबग सुरु असते. सुभद्रा हिंगे या विवाह करून सासरी आल्यानंतर त्यांनी पतीच्या हॉटेल व्यवसायात हातभार लावला. १९८१ मध्ये पतीच्या निधनानंतर सर्व जबाबदारी सुभद्रा हिंगे यांच्या खांद्यावर आली त्यांनी न डगमगता धीराने सर्व परिस्थितीला सामोरे जात व्यवसाय सांभाळून कुटुंब सावरले गेली ६० वर्षापासून त्या स्वत: हाताने गोडी शेव, भजी, जिलेबी, शेव चिवडा हे पदार्थ बनवतात. सुभद्रा हिंगे यांनी बनवलेल्या पदार्थांची चवही अनोखी असल्याने यात्रेला आलेले पाहुणे, सगे सोयरे, माहेरवाशिण हमखास ताईच्या हातची गोडी शेव, भजी, जिलेबी चाखल्या शिवाय जात नाही. ताई पदार्थ बनविण्यासाठी उच्च दर्जाचे तेल, बेसनपीठ वापरत असल्याने पदार्थ जास्त दिवस टिकतात. त्यांचा मुलगा जयसिंगराव, मुलगी यशोदा करंजखेले त्यांच्या पाठोपाठ तिसरी पिढी जयसिंगराव यांचा मुलगा विणूनेही ताईच्या हॉटेल व्यवसायाचा वारसा जपला असून विणूच्या हातची मिसळ आणि वडापावची चव चाखायला खवय्ये येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com