फ्लॉवरच्या उत्पादनातून साडेतीन लाखांचा नफा

फ्लॉवरच्या उत्पादनातून साडेतीन लाखांचा नफा

पारगाव, ता. १८ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील मयूर बाळासाहेब चवरे या प्रगतशील शेतकऱ्याने अडीच एकरामध्ये फ्लॉवरचे भरघोस उत्पादन घेतले. त्यातून त्यांनी दोन महिन्यांत सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. अडीच लाख रुपयांचा उत्पादन खर्च वजा जाता साडेतीन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे.
चवरे याने वडील बाळासाहेब चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अडीच एकर क्षेत्रात १५-२२ फ्लावर वाणाची ४२ हजार ५०० रोपे लावली शेताला विहिरीतील पाणी पाट पाण्याने दिले. प्रत्येक रोप ९० पैसे या दराने पडले, मजुरी, खते, औषध यावर एकूण उत्पादन खर्च अडीच लाख रुपये आला. ५० दिवसानंतर प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. चवरे यांना जागेवरच फ्लॉवरला प्रती १० किलोला १५० ते १७० रुपये बाजारभाव मिळाला.

एकूण ७०० पिशवी फ्लॉवर उत्पादन मिळाला आहे. एका पिशवीचे वजन ५० ते ५५ किलो भरते. सध्या फ्लॉवरला मिळत असलेला बाजारभावामुळे एकूण सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून अडीच लाख रुपयांचा उत्पादन खर्च वजा जाता साडेतीन लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला.
- मयूर चवरे, फ्लॉवर उत्पादक


02639

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com