वडापावला बटाट्याच्या दरवाढीचा तडका

वडापावला बटाट्याच्या दरवाढीचा तडका

पारगाव, ता. ८ : गरीब असो की श्रीमंत सर्वांना आवडणाऱ्या झणझणीत वडापावला बटाटा दरवाढीचा तडका बसल्याने विक्रेत्यांनी वडापावच्या किमतीत वाढ केली आहे. बाजारात बटाट्याची आवक घटल्याने बटाट्याच्या दरात जवळजवळ दुप्पटीने वाढ झाली आहे. १५ ते १७ रुपये प्रती किलोने मिळणाऱ्या बटाट्याचा बाजारभाव प्रती किलो ३० ते ३५ रुपयांवर गेला आहे. बटाटा असा पदार्थ आहे हॉटेल व्यवसाय असो की घरगुती वापर तो मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.
रस्त्यावरील हातगाडीपासून मोठे हॉटेल, फूड मॉल येथे सहज उपलब्ध असलेल्या वडापावची किंमत जागेनुसार बदली आहे. साधारणपणे ग्रामीण भागात १२ ते १५ रुपयांना मिळणारा वडापावची मजल आता २० रुपयांपर्यंत गेली आहे. तर शहरी भागात २० ते २५ रुपयांपर्यंत याची किंमत आढळून येत आहे.

बटाट्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. नवीन बटाटा बाजारात येण्यास अजून चार ते पाच महिने लागणार आहेत. वडापावच्या किमती वाढवून सुद्धा आमच्या खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने भविष्यात नाइलाजाने वडापावच्या किमतीत आणखीन वाढ करावी लागेल.
विनू हिंगे पाटील, वडा पाव विक्रेता, अवसरी बुद्रुक

दोन वर्षात हवामानातील बदल, दरातील चढ-उतार यामुळे बटाटा पिकाला बाजारभाव मिळत नसल्याने बटाटा पिकाचे आगर समजले जाणाऱ्या उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये दोन वर्षात बटाट्याच्या उत्पादनात मोठी घट झाली. मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी बटाट्याचे पीक घेतले त्यांनी भविष्यात बाजारभाव वाढतील या आशेने विक्री न करता बटाटा कोल्ड स्टोअरेजमध्ये साठवला आहे. त्यामुळे बाजारात बटाट्याची आवक कमी झाल्याने बटाट्याचे दर वाढले आहेत.
महेंद्र वाळुंज, बटाटा, कांदा आणि लसूणचे आडतदर, लोणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com