पाइपलाइनच्या खोदाईमुळे 
लबडेमला रस्त्याची दुरवस्था

पाइपलाइनच्या खोदाईमुळे लबडेमला रस्त्याची दुरवस्था

Published on

पारगाव, ता. ५ : पारगाव (ता. आंबेगाव) येथील जलजीवन मिशन अंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. पाईपलाईनसाठी खोदाई करताना अनेक ठिकाणी शेतीसाठीच्या पाइपलाइनला फटका बसला आहे. लबडेमळा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे फुटलेल्या पाइपलाइन दुरुस्ती व रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाला स्थगिती द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने उपअभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना पाठवलेल्या पत्राव्दारे केली आहे.

येथील जलजीवन मिशन अंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे अनेक महिन्यांपासून काम सुरू आहे. पाईपलाईनसाठी खोदाई करताना अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीसाठीच्या पाइपलाइन फुटल्या आहेत. लबडेमळा रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्त्याला खेटून पाईपलाईनसाठी खोदाई केली आहे. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. त्याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे. शेतीच्या फुटलेल्या पाईपलाईनची व रस्त्याची त्वरित दुरुस्ती व्हावी, तसेच पाईपलाईनची खोदाई जमिनीपासून ०.९० मीटर खोल व्हावी. ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपुरवठा योजनेच्या अंदाज पत्रकाबाबत मागणी करूनही ठेकेदाराकडून कोणतीही माहिती दिली जात नाही, अशा प्रकारे पत्रात उल्लेख केला आहे.

पाईपलाईनची खोदाई जमिनीपासून ०.९० मीटर खोल असावी, ती जर नसेल तर संबंधित ठेकेदाराकडून करून घेतली जाईल. फुटलेल्या पाईपलाईनची व रस्त्याची दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडून करून घेतली जाईल.
- संजय भोसले, शाखा अभियंता, जीवन प्राधिकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.