अवसरीच्या विद्यार्थ्यांनी केले सीडबॉलचे रोपण

अवसरीच्या विद्यार्थ्यांनी केले सीडबॉलचे रोपण

पारगाव, ता. ५ : अवसरी बुद्रूक (ता. आंबेगाव) येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चिंच, लिंब, जांभूळ, आंबा, बाभूळ, आवळा व अन्य देशी वृक्षांच्या बियांचे माती व शेणाच्या साह्याने गोळे करून १३ हजार सीडबॉल बनवून त्याचे रोपण केले.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विद्यार्थ्यांना लहान वयातच वृक्ष लागवडीचे महत्त्व समजले तर भविष्यात विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर झाडे लावून पर्यावरण समतोल ठेवतील असे प्रतिपादन मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी केले.

येथील विद्या विकास मंदिर या विद्यालयाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे पाटील यांच्या संकल्पनेतून सुमारे १३ हजार सीडबॉल तयार करण्याचा उपक्रम शाळेत राबविला होता. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सीडबॉलसाठी चिंच, लिंब, जांभूळ, आंबा, बाभूळ, आवळा व अन्य देशी वृक्षांच्या बियांच्या साह्याने माती व शेणाचे गोळे करून सीडबॉल बनून शाळेमध्ये शिक्षकांच्या मदतीने जमा केले.

जमा केलेल्या सिडबॉलचे अवसरी बुद्रूक हद्दीतील डोंगरावर वनखात्याच्या हद्दीत असणाऱ्या जंगल भागात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या व वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने रोपण केले.

यावेळी भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक शांताराम बापू हिंगे, वसंत हिंगे, दीपक चवरे, भाऊसाहेब टाव्हरे, सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे, प्राचार्य सुरेश जारकड व पर्यवेक्षिका माधुरी खानदेशे, शिक्षक, वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक सी. एस. शिवचरण, ऋषिकेश कोकणे, अरुण खंडागळे व विद्यार्थी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com