अवसरी बुद्रुकच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीमध्ये बाजी

अवसरी बुद्रुकच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीमध्ये बाजी

पारगाव, ता. ८ : अवसरी बुद्रूक (ता. आंबेगाव) येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान या विद्यालयाचे इयत्ता पाचवीचे तीन व इयत्ता आठवीचे चौदा असे एकूण १७ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य सुरेश जारकड यांनी दिली.

शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना सुदर्शन शेवाळे, स्मिता सोनवणे, सुषमा हिंगे, मोरे मॅडम बाबाजी चव्हाण, नवनाथ टाव्हरे, राधाकिसन कानवडे, जितेंद्र त्रिवेदी यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष विष्णू हिंगे पाटील, कार्याध्यक्ष गणपत हिंगे पाटील, सचिव वसंत हिंगे पाटील, विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन हिंगे पाटील यांनी अभिनंदन केले.

शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची नावे व कंसात मिळालेले गुण पुढीलप्रमाणे : आयुष हिंगे (२४६), आविष्कार हिंगे (२४४), आर्या चव्हाण (२४४), सेजल अरगडे (२४४), शार्विल वाघ (२३२), सान्वी पिंगट (२१४), श्रेया ढोबळे (२१४), प्रांजल बोंबे (२१०), पार्थ वळसे (२०६), वेदांत गाडेकर (२०२), दिव्यांश चव्हाण (२००), वेदिका मेंगडे (१९८), सोहम मोरडे (१९६), सोहम गांजाळे (१९६), वैदेही पवार (१९०), तनिष्का गाजरे (१९०), श्रेयस गवारी (१८२)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com