‘श्री गडदादेवी’ सोसायटीच्या सचिव, लेखनिक विरोधात गुन्हा
पारगाव, ता. १ : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री गडदादेवी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सचिव आणि लेखनिक यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. शेतकऱ्यांनी दिलेली कर्जाची रक्कम बॅंकेत जमा न करता स्वतः:च्या फायद्याकरिता वापरल्याचा ठपका ठेवला आहे. तीन कर्जदारांनी कर्जाचा भरणा करण्यासाठी दिलेले पाच लाख ३० हजार १२८ रुपये बँकेत जमा न करता संस्थेच्या लेटर पॅडवर कर्जबाकी नसल्याचा दाखला देत ही रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता वापरल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
विवेक कैलास वाघमारे यांनी पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कर्जदार गोरक्ष बबन पोखरकर (रा. पोंदेवाडी ) यांनी ६७ हजार ५०० रुपये, कर्जदार दत्तात्रेय नाथा नरवडे (रा. पोंदेवाडी) यांनी दोन लाख ९० हजार ७०० रुपये आणि कर्जदार रतन देवजी वाळूंज (रा. पोंदेवाडी) यांनी एक लाख ७१ हजार ९२८ रुपये रक्कम ता. १० जुलै २०२३ ते १० मार्च २०२५ या कालावधीत संस्थेचे सचिव शंकर महादेव लबडे व लेखनिक संदेश जयसिंग पोंदे यांच्याकडे कर्जाचा भरणा करण्यासाठी दिली होती. या दोघांनी संगनमत करून सोसायटीच्या लेटर पॅडवर कर्जबाकी नसल्याचा दाखला देऊन ही रक्कम बँकेत न भरता स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता वापरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.