बाजारभाव गडगडल्याने उत्पादकांना फटका
पारगाव, ता. १२ : बाजारभाव गडगडल्याने गवार उत्पादक शेतकऱ्यांचा मजुरी खर्चसुध्दा निघत नाही. यामुळे उत्पादकांना फटका बसला आहे. महिन्यापूर्वी गवारीला प्रती १० किलोला १००० ते ११०० रुपये बाजारभावात मिळत होता. आता त्यात घसरण होऊन तो सुमारे १५० ते २०० रुपयांवर आला आहे. तोटा सहन करावा लागल्याने शेतकऱ्यांचे वर्षभराचे गणित कोलमडले आहे.
कमी पाण्यावर कमी भांडवली खर्चावर कमी दिवसात चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावात गवारीचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, जारकरवाडी, बढेकरवस्ती, धामणी, खडकवाडी, वाळुंजनगर, रानमळा पोंदेवाडी, लाखणगाव, लोणी व मांदळेवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणावर गवारीची शेती केली जाते.
लोणी - धामणी परिसरातील गावांमध्ये शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या भागात उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असते. त्यामुळे शेतीसाठी पाणी कोठून मिळणार त्यामुळे या भागातील शेतकरी अनेक वर्षांपासून कमी भांडवलात कमी कालावधीत व कमी पाण्यावर चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून गवारीची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या सुरवातीला गवारीची लागवड केली जाते. पाण्याच्या कमतरतेमुळे लोणी धामणी परिसरातील गवार लागवडीचे क्षेत्र काही प्रमाणात घटले असले तरी डिंभा उजवा कालव्याच्या पाण्यामुळे जारकरवाडी, बढेकरवस्ती, खडकवाडी, रानमळा, पोंदेवाडी , लाखणगाव व वाळुंजनगर या भागातील शेतीला पाणी उपलब्ध झाल्याने या गावांमध्ये गवार लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे, असे शेतकरी नीलेश पडवळ यांनी सांगिले.
उत्पादक जयेश वाळुंज म्हणाले...
१. पावसाचा शेतातील सर्वच पिकांना फटका.
२. तरकारी मालाच्या उत्पादनात घट
३. पावसाने उघडीप दिल्याने बाजारात सर्व तरकारी पिकांची आवक वाढ
४. गवारीची आवक वाढल्याने बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण
गवार तोडण्यासाठी एका महिलेला ३०० ते ४०० रुपये दिवसाला हजेरी द्यावी लागते एक महिला एका दिवसात २० किलो गवार तोडते म्हणजेच एक किलो गवार तोडण्यासाठी महिलेला १५ ते २० रुपये मजुरी खर्च येतो. औषध फवारणी, वाहतूक खर्च असा एक किलो गवारीला एकूण २० रुपये खर्च येतो. सध्या गवारीला प्रती १० किलोला १५० ते २०० रुपये बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्याचा हातात काहीच शिल्लक राहत नाही.
- नीलेश पडवळ, गवार उत्पादक, पोंदेवाडी (ता. आंबेगाव)
05928, 05930, 05929
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.