सौरऊर्जेच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा प्रकल्प पथदर्शी

सौरऊर्जेच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा प्रकल्प पथदर्शी

Published on

पारगाव, ता.१६ : ‘‘‍धामणी (ता. आंबेगाव) परिसरातील शेतकरी एकत्र येऊन शेतीसाठी राबवीत असलेल्या सामूहिक सिंचन योजनेसाठी येथे महावितरणने महाराष्ट्रात प्रथमच उभारलेल्या २५ एचपी क्षमतेच्या ऑफ-ग्रीड सौर कृषी पंप प्रकल्प हा पथदर्शी प्रयोग आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून शाश्वत शेतीसाठी हा प्रकल्प आदर्श ठरेल,’’ असा विश्वास माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकल्पास वळसे पाटील यांनी रविवारी (ता.१४) भेट देऊन प्रकल्प उभारणीच्या कामाचा आढावा घेतला व परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेतले.
यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता युवराज जरक, कार्यकारी अभियंता राहुल गवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू काका हिंगे, युवकचे तालुकाध्यक्ष वैभव उंडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे माजी सभापती नीलेश थोरात, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, रामचंद्र ढोबळे, सागर जाधव, अक्षय विधाटे, प्रतीक जाधव, गणेश भुमकर, वामन जाधव, प्रतीक्षा बढेकर, सचिन टाव्हरे, अनिल डोके, रवींद्र काकडे, विलास लबडे, संकेत वायकर व इतर ग्रामस्थ तसेच धामणी गावातील विविध पाणीउपसा योजनांमधील समाविष्ट शेतकरी उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या धामणी गावातील शेतकरी एकत्र येत लाखो रुपये खर्च करून डिंभा उजव्या कालव्यावर सामूदायिक उपसा सिंचन योजना राबवण्यास सुरुवात केली. परंतु राज्यात यापुढे शेतीपंपासाठी नवीन वीज जोड देणे बंद केले आहे. सोलरवर शेतीपंप चालवावा असे शासकीय धोरण असल्याने परिसरात एकूण सुमारे साडेतीन ते चार कोटी रुपये खर्च करून सुरू होत असलेल्या या सर्व नऊ उपसा सिंचन योजना अडचणीत आल्या आहे. जास्त अश्वशक्तीच्या शेतीपंपासाठी सोलर यंत्रणा उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करणे त्यासाठी येणारा अवाढव्य खर्च त्याच बरोबर जास्त अश्वशक्तीचे कृषी पंप सोलर वर पूर्ण क्षमतेने चालतील का? याबाबत शेतकऱ्यांच्या मनात अनेक शंका आहेत. या संदर्भामध्ये ग्रामस्थांना ज्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणीच्या संदर्भामध्ये या भागातील शेतकऱ्यांनी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेऊन शासन दरबारी मदत करण्याची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com