पुणे
पारगाव येथील ज्येष्ठाची आत्महत्या
पारगाव, ता. २२ : पारगाव (ता. आंबेगाव) येथील कौटमळा येथे सोमवारी (ता. २२) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राजाराम कोंडिबा थोरात (वय ६५, रा. पारगाव- कौटमळा) यांनी शेतात लिंबाच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. याबाबत तुषार निवृत्ती थोरात यांनी पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी थोरात हे पुणे येथून गावी आले हेते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास थोरात यांनी फाशी घेत आत्महत्या केली. त्यानंतर नागरिकांनी त्यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येचे कारण समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे करत आहे.