धामणी येथील विद्यालयाला सीसीटीव्ही कॅमेरे भेट
पारगाव, ता. २९ : धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री शिवाजी विद्यालयातील १९९६ च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल २९ वर्षानंतर स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी उपजिल्हाधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाळेला सव्वा लाख रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे प्रदान करण्यात आले.
१९९६ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी सव्वा लाख रूपये वर्गणी जमा करून हे सीसीटीव्ही कॅमेरे विद्यालयास भेट दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य मारूती सोमवंशी होते.
यावेळी विद्यालयाचे शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच, सर्वांनी आपल्या १९९६ च्या काळातील आठवणींना उजाळा देत सर्वांनी एकमेकांची ओळख करून देत, जुन्या शाळेत घडलेल्या गमतीजमती, शिक्षकांनी केलेल्या शिक्षा, केलेले कौतुक याबद्दलच्या चर्चा रंगल्या. प्रत्येकाने आपले शाळेबद्दलचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश जाधव यांनी केले. यावेळी उद्योजक अमोल गाढवे, शिक्षिका सुजाता गायकवाड, सुभाष करंडे, संतोष रणपिसे, शर्मिला पडवळ, सुवर्णा निघोट, अपर्णा शिनलकर, मनिषा नाणेकर, सुभाष रणपिसे, विजया भिसे, अलका विधाटे, योगिता कड, शोभा बढेकर या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. पी. के. शेंडकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.