पुणे
भीमाशंकर कारखान्याची गुरुवारी गव्हाण पूजन
पारगाव, ता. २८ : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५- २६ च्या २६व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ व गव्हाण पूजन समारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. २) सकाळी नऊ वाजता कारखान्याचे संस्थापक-संचालक व माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. हा कार्यक्रम वारकरी संप्रदायातील संत, महंत, कीर्तनकार महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेला आहे. तरी सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले आहे.