भीमाशंकर कारखान्याकडून साखर वाटप सुरू
पारगाव, ता. ४ : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मार्गदर्शनानुसार सभासद व ऊस उत्पादकांना प्रतिवर्षाप्रमाणे दीपावलीनिमित्त साखर वाटप शनिवारपासून (ता. ४) सुरू झाले आहे. शनिवार ते रविवार (ता. १२) या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत २० प्रति किलो दराने नियोजनानुसार गावोगावी साखर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
शनिवारी पारगाव गटातील गावात साखर वाटण्यात आली. रविवारी (ता. ५) पारगाव गाव, निरगुडसर व जांबूत गटातील गावे, सोमवारी (ता. ६) निरगुडसर व पिंपरखेड गाव, कळंब व रांजणी गटातील गावे, मंगळवारी (ता. ७) मंचर गटातील गावे, बुधवारी (ता. ८) मंचर व अवसरी खुर्द गाव व घोडेगाव गटातील गावे, गुरुवारी (ता. ९) टाकळी हाजी व कवठे गटातील गावे, शुक्रवारी (ता. १०) टाकळी हाजी व कवठे गाव, करंदी, जातेगाव गटातील गावे, शनिवारी (ता. ११) करंदी व जातेगाव गाव, भोरवाडी, निमगाव सावा, नारायणगाव, ओझर गटातील गावे, रविवारी (ता. १२) भोरवाडी, निमगाव सावा, नारायणगाव, खेड गटातील गावे.
नियोजित कालावधीत साखर घेऊ शकणार नाहीत, त्यांना साखर सोमवार (ता. १३) ते सोमवार (ता. २०) या कालावधीमध्ये (साप्ताहिक सुट्टी गुरुवार सोडून) कारखाना साइटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत वाटप केली जाणार आहे. त्याशिवाय राहिलेल्या सभासद व ऊस उत्पादकांना सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी कारखाना साइटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत साखर वाटप करण्यात येणार आहे, असे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले.