सुसंस्कृत राजकारणी

सुसंस्कृत राजकारणी

Published on

सुसंस्कृत राजकारणी

राजकारणात हेवेदावे, विरोधक, वैर, पराकोटीचे मतभेद, पातळी सोडून केली जाणारी टीकाटिप्पणी या गोष्टी नित्याच्याच झाल्यात, असे वाटले तर काही गैर नसावे. अशा संवेदनशील बनत चाललेल्या राजकीय परिस्थितीत दिलीप वळसे पाटील यांच्याकडे एक सुसंस्कृत आणि अजातशत्रू राजकारणी म्हणून पाहिले जात आहे. सभ्यता आणि सुसंस्कृतपणा या गोष्टी त्यांनी खूप जपल्या आहेत. अशा सुसंस्कृत आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा राजकारणी लोकांची नितांत आवश्यकता आहे.

- ज्ञानेश्वर विधाटे,
उद्योजक, अध्यक्ष- संत सावता माळी विकास मंडळ, धामणी (ता. आंबेगाव)

काही व्यक्तिमत्त्वे ही संस्कारित असतात. घरचे, राजकारणाचे आणि समाजाचे संस्कार स्वतंत्र असल्याने व्यक्तिमत्वाला परिपूर्णता मिळणे तसे अवघडच. जरी त्या त्या संस्कारांचा प्रभाव असला तरी दिलीप वळसे पाटील यांच्यात सुसंस्कृत संस्कार जाणवतात. त्यांच्या निर्णयात सामाजिक संस्कार आणि भाषणांत भाषेचा सुसंस्कारितपणा दिसतो. सामाजिक बांधिलकी सांगणारा आणि समाजाची जाण ठेवणारा त्यांचा एक निर्णय येथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. विषय वैद्यकीय शिक्षणाचा होता. डॉक्टर, इंजिनिअरचे शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. गरिबांच्या शिक्षणासाठी बँकेतून कर्ज उपलब्ध करून देऊ, अशी घोषणा केली. पण कर्ज घ्यायलासुद्धा पत लागते, जी या गरिबांकडे नसते. अशा परिस्थितीत साखर कारखाने, सूत गिरण्या यांना जशी कर्ज पुरवठ्यासाठी सरकारची हमी असते, तशी हमी दिलीप वळसे पाटील यांनी सरकारसमोर आपली भूमिका मांडून मिळवून दिली. सामाजिक बांधिलकीशी आपण किती निष्ठावंत आहोत, हे त्यांनी नेहमीच दाखवून दिले आहे.
आपण आपल्या कार्यातून महाराष्ट्र जोडत गेलात. सामाजिक बांधिलकी जपत गेलात. ३० जुलै २०१४ रोजी माळीण दुर्घटना घडली. आपण स्वतः जातीने हजर झालात. लोक अक्षरशः आपल्या गळ्यात पडून रडताना पाहण्यात आले. आपण या आदिवासींना धीर दिलात. घटना पाहून हेलवलात. मात्र आपत्ती व्यवस्थापन तंत्रज्ञानाने आपण परिस्थिती पूर्वपदावर आणलीत. पुनर्वसन केलेत. आज माळीण गाव मोठ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभे केलेत. केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, आपण स्वतः, जिल्हाधिकारी, नियोजन समिती यांचे सहकार्याने अल्पावधीतच माळीण पूर्ववत केलेत. आदिवासींसाठी आपल्याकडून अधोरेखित असे कार्य झाले आहे.

अजातशत्रू राजकारणी
माणसं जोडण्याची कला ही केवळ आपल्या कार्यातून साधलीत. सर्वप्रिय, लोकप्रिय, सामाजिक बांधिलकी जपणारा नेता अशी बिरुदे दिलीप वळसे पाटील यांना शोभून दिसतात. ते गेली ४५ वर्षांपासून राजकीय जीवनात आहेत. व्यक्तिगत जीवन कमी आणि सार्वजनिक अर्थात लोकाभिमुख जीवन जास्त, असे दिलीप वळसे पाटील यांचे जीवन राहिले आहे. या ४५ वर्षांच्या कारकिर्दीत अजातशत्रू अशी त्यांची ओळख बनून राहिली आहे. राजकारणात हेवेदावे, विरोधक, वैर, पराकोटीचे मतभेद, पातळी सोडून केली जाणारी टीकाटिप्पणी या गोष्टी नित्याच्याच झाल्यात, असे वाटले तर काही गैर नसावे. अशा संवेदनशील बनत चाललेल्या राजकीय परिस्थितीत दिलीप वळसे पाटील यांच्याकडे एक सुसंस्कृत आणि अजातशत्रू राजकारणी म्हणून पाहिले जात आहे. राजकीय जीवनात टीका होत नाही, असे मुळीच नाही. पण त्या टीकेला एक तात्त्विक अधिष्ठान असते. असभ्य, असंस्कृत, वैचारिक दिवाळखोरी, असे मापदंड लाभलेली टीका दिलीप वळसे पाटील यांच्यावर झाल्याचे आजपर्यंत ऐकिवात नाही. याला कारण त्यांचे सुसंस्कृत असणे.

कामांची जंत्री न संपणारी
दिलीप वळसे पाटील यांनी राज्याच्या राजकारणात उच्च व तंत्रशिक्षण खात्यापासून ते अगदी गृह खात्यापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण खात्यांचा कारभार पाहिला आहे.या प्रत्येक खात्याला व त्या माध्यमातून राज्यातील जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. वीज मंडळाचे त्रिभाजन, एम.के.सी.एल.ची स्थापना, पोलिसांना वनस्टेप प्रमोशन, असे अनेक निर्णय वळसे पाटील यांनी घेतलेत. दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या दूरदर्शी कामांची जंत्री ही न संपणारी आहे. पण या प्रत्येक विभागात काम करत
असताना अभ्यासूवृत्ती, वक्तशीरपणा, शिस्त, संयम, टीकेला कामातून उत्तर देणे, आदी गोष्टी त्यांनी खूप जपल्या आहेत. म्हणूनच आज महाराष्ट्रातून त्यांच्याविषयी आदरभाव दाखवला जातो.

सुसंस्कृतपणा जपला
निष्ठा, तत्त्वांशी प्रामाणिक राहणे, वैचारिक उंची ठेवणे, स्वतःला अद्ययावत ठेवणे, कामसूपणा, अभ्यासूवृत्ती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सभ्यता आणि सुसंस्कृतपणा या गोष्टी त्यांनी खूप जपल्या. आज महाराष्ट्रातील राजकारण आणि काही राजकीय नेत्यांची भाषा ऐकली तर मन सुन्न होते. आपल्या महाराष्ट्राची नक्की ओळख कोणती? असा प्रश्न पडतो. अशा परिस्थितीत दिलीप वळसे पाटील यांचे सुसंस्कृत असणे हे उठून दिसते. आणि खरंच, महाराष्ट्राला अशा सुसंस्कृत आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा राजकारणी लोकांची नितांत आवश्यकता आहे.
साहेब आपल्याला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

(शब्दांकन- सुदाम बिडकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com