धामणीमध्ये आजपासून यात्रेस प्रारंभ

धामणीमध्ये आजपासून यात्रेस प्रारंभ

Published on

पारगाव, ता. १ : ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात भंडार-खोबऱ्याची मुक्त उधळण करत हजारो भाविकांनी धामणी (ता. आंबेगाव) येथील म्हाळसाकांत खंडोबाचे दर्शन घेतले.
आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हाळसाकांत खंडोबाच्या यात्रेस रविवार पासून सुरुवात झाली. मंदिर परिसरात व्यापाऱ्यांनी भंडार, खोबरे, पेढे विक्रीची दुकाने लावली होती. सकाळी धामणी, लोणी, शिरदाळे, पहाडदरा, ज्ञानेश्‍वरवस्ती, अवसरी खुर्द, गावडेवाडी, महाळुंगे (पडवळ), लांडेवाडी, जारकरवाडी या गावातील भाविकांनी पारंपरिक वाद्यांच्या सुरात तसेच ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने देवास हारतुरे, मांडवडहाळे व नैवेद्य अर्पण केले. यावेळी नवसांच्या बगाडांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिराच्या आवारात भाविकांनी खंडोबाची जागरणे केली तसेच तळी भरली. यात्रा उत्सव कमिटीने दुकाने, हॉटेल व्यावसायिकांसाठी जागा ठरवून दिल्या. दोन दुकानांच्या रांगेमध्ये पुरेसे अंतर ठेवल्याने गर्दीची कोंडी टाळता आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. यात्रेची व्यवस्था यात्रा उत्सव समिती, ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि धामणी, लोणी, शिरदाळे, पहाडदरा, ज्ञानेश्‍वर वस्ती या गावातील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहिली. यात्रेनिमित्त परिसरात कोणताही फ्लेक्स लावण्यास मनाई करण्यात आल्याने कोठेही फ्लेक्स दिसला नाही. खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नेताजी गंधारे, पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे यांच्या नेतृत्वाखाली एक सहाय्यक पोलिस निरीक्षक, एक पोलिस उपनिरीक्षक, ३० पुरुष पोलिस कर्मचारी, ५ महिला पोलिस कर्मचारी व दंगा काबू पथकाचे १० जवान यांनी चोख बंदोबस्त ठेऊन पार्किंग व्यवस्था उत्तम ठेवल्यामुळे भाविकांना कमी कालावधीत सुलभ दर्शन घेता आले तसेच वहातूक कोंडी टाळता आली.
व्यवसाय तसेच नोकरीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई, ठाणे शहरात असणारे या भागातील नागरिक आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने कुटुंबासह यात्रेला आल्याने आज पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com