जुन्नर तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींत प्रशासक
जुन्नर, ता. ११ ः जुन्नर तालुक्यातील पासष्ट ग्रामपंचायतीच्या गाव कारभाऱ्यांची मुदत संपुष्टात आली आहे. या ग्रामपंचायतीवर यापुढील काळात निवडणुका होईपर्यंत प्रशासकाकडून कारभार चालविला जाणार आहे. याबाबतचे प्रशासकाच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी दिले आहेत.
तालुक्यातील प्रशासक नेमण्यात आलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे ः
प्रशासकाचे नाव व ग्रामपंचायती
लक्ष्मण झांजे ः येडगाव, पिंपरी पेंढार, पेमदरा, आगर, ओतूर, आळे, राजुरी, निमगाव सावा, कोळवाडी, कुसूर, उंचखडक, शिरोली बुद्रुक
एम. एम. भोईर ः आलमे, अलदरे, खानापूर, कुरण , बल्लाळवाडी, बेलसर, कुमशेत
विनायक मोढवे ः धालेवाडी तर्फे हवेली, वडज, शिंदेवाडी, हिवरे बुद्रुक, निरगुडे, पिंपळगाव सिद्धनाथ, खामुंडी, शिरोली खुर्द, हिवरे खुर्द, हिवरे तर्फे नारायणगाव, मांजरवाडी, गुंजाळवाडी (आर्वी), निमदरी
राजू कोंढावळे ः धामणखेल, खिलारवाडी, वडगाव सहानी, चिंचोली, निमगाव तर्फे महाळुंगे, बस्ती, विठ्ठलवाडी, आर्वी, काटेडे.
एस. एस. जंजाळ ः ओझर नंबर एक, मांदारणे, विघ्नहरनगर, धोलवड, उदापूर, धनगरवाडी, अहिनवेवाडी, गोळेगाव, डिंगोरे, रोहकडी, ठिकेकरवाडी, नेतवड, वारूळवाडी, खोडद, वडगाव कांदळी.
एम. जे. चौगुले ः भोरवाडी, औरंगपूर, संतवाडी, नळावणे, जाधववाडी, बोरी बुद्रुक, तेजेवाडी, बोरी खुर्द, पिंपळगाव तर्फे नारायणगाव.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे बऱ्याच वर्षांनी जिल्हा परिषदेमधील प्रशासकीय राजवट संपली. नवनियुक्त अध्यक्ष व सदस्य यांच्या माध्यमातून कारभार सुरू होणार तोच पासष्ट हून अधिक ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नियुक्त झाल्याने या ग्रामपंचायतींमधील लोकप्रतिनिधींचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

