इंदापुरात मकवानाच्या बाजारभावात घसरण

इंदापुरात मकवानाच्या बाजारभावात घसरण

Published on

बावडा, ता. २० : इंदापूर तालुक्यात खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी मकवानाची लागवड उपलब्ध क्षेत्रावर केली आहे. यामुळे उत्पादन अधिक झाल्याने मकवानाच्या बाजारभावात तालुक्यात घसरण सुरू झाली आहे.
मकवानाला गेल्या काही दिवसांपूर्वी प्रतिगुंठा सुमारे ९०० ते १४०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत होता. मात्र, आता मकवानाचे पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने व मकवानाची आवक सुरू झाल्याने बाजारभाव घसरले आहेत.
दुभत्या जनावरांना हिरव्या चाऱ्यासाठी सध्या मकवान सहज उपलब्ध होत आहे. दूध उत्पादकांना हिरव्या चाऱ्यासाठी मकवानाचा मोठा आधार प्राप्त झाला आहे. मकवानापासून मुरघास तयार करण्याकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा कल काही वर्षांपासून वाढला आहे. त्यामुळे चारा टंचाईवर मोठ्या प्रमाणावर मात करता येणे शक्य होणार असल्याचे दिसते.
मकवानाचे पीक हे वर्षभर तिन्ही हंगामात घेतले जाते. अवघ्या साडेतीन ते चार महिन्यात हिरव्या मकवानाची विक्री करता येत असल्याने व आगामी काळात मागणी वाढतच राहणार असल्याने अनेक शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून नियोजन करून जास्तीत जास्त उपलब्ध क्षेत्रावरती मकवानाची लागवड केल्याचे दृश्य दिसून येत आहे. वकील वस्ती येथील बीएससी ॲग्री शेतकरी नानासाहेब माळशिकारे यांनी व्यक्त केली.


00867

Marathi News Esakal
www.esakal.com