व्यापाऱ्यांकडून केळी उत्पादकांची लूटमार
बावडा, ता. ३ : केळीला सध्या नीचांकी बाजारभाव मिळत आहे. व्यापाऱ्यांकडून उत्पादकांची लूटमार होत आहे. त्या पार्श्वभूमीवर तसेच नुकसान टाळण्यासाठी विक्रीसाठी तोडलेली केळी साठवण्यासाठी शीतगृहे उभारावीत, अशी मागणी बावडा (ता. इंदापूर) परिसरातील केळी उत्पादकांकडून शासनाकडे होत आहे. या शीतगृहामध्ये पाच ते दहा एकर केळीचा माल ठेवतात येईल. तो योग्य बाजारभाव आल्यावर विक्री करता येईल. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना १०० ते २०० टन क्षमतेची केंद्रे उभारण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी केळी उत्पादक धैर्यशील पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.
बावडा परिसरातील संजय नायकुडे, उमेश पाटील, नाना पाटील, अमर फडतडे, विकास शिंदे, अशोक मगर, कुमार पवार, सत्यजित आसबे अशा अनेक केळी उत्पादकांना कमी बाजारभावाचा फटका बसला आहे. त्यातच केळीचा बाजारभाव दररोज घसरत आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. व्यापारी कमी बाजारभावात केळी खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. मिळणाऱ्या उत्पनातून उत्पादन खर्चही भागत नसल्याने शेतकरी वर्गात कमालीची नाराजी पसरली आहे.
केळी उत्पादनासाठी तीन एकराला जवळपास सहा ते सात लाख रुपये खर्च झाला आहे. परंतु व्यापाऱ्यांनी निर्यातीला मागणी असूनही बारा रुपये ते पंधरा रुपयापर्यंत बाजारभाव केले आहेत. तर खोडवा केळी तर कवडीमोल किमतीत म्हणजे दोन ते तीन रुपये किलोला खरेदी करीत आहेत. यामुळे आर्थिक संकटात सापडलो आहे.
- संजय नायकुडे, केळी उत्पादक
केळी विक्रीची सद्यःस्थिती
- व्यापाऱ्यांनी एकमताने जाणीवपूर्वक बाजारभाव पाडले.
- कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सक्षम व्यापार नसल्यामुळे व्यापाऱ्यांवर नियंत्रण नाही.
- उत्तम प्रतीची लागवडीचे केळी कमी भावात व्यापाऱ्यांकडून खरेदी.
- खोडवा पिकाच्या केळीला जाणीवपूर्वक कमीत कमी भाव.
- शेतकऱ्यांना माहीत नसलेल्या घटनांची भीती दाखवून बाजारभाव पाडले जातात.
- आठ जानेवारीनंतर केळी पिकावर चिलिंग रोग पडणार असल्याची भीती दाखविली जाते
- विक्रीसाठी शेतकऱ्यांकडे पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याचा व्यापाऱ्यांकडून गैरफायदा.
उत्पादक आर्थिक संकटात
दिवाळीच्या अगोदर केळीला २७ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत होता. सध्या निर्यातक्षम केळीला १५- १६ रुपये प्रतिकिलोस बाजारभाव मिळतो. असे असताना व्यापारी शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. कमी भावात माल खरेदी करत आहेत. उत्पादन खर्च एकरी दोन लाख रुपये खर्च आहे. सध्या तीन रुपये किलो प्रतिकिलोस बाजारभाव असल्याने उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.
निर्यातक्षम केळीला मागणी असूनही १२ ते १५ रुपयापर्यंत बाजारभाव केले आहेत. माझी इराकला निर्यात करण्यासाठी तोडून तयार आहे. मात्र त्याला योग्य बाजारभाव नाही.
- अभिजित घोगरे, केळी उत्पादक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

