भुकूम ग्रामस्थ उभारणार आठ कोटी खर्चून मंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भुकूम ग्रामस्थ उभारणार
आठ कोटी खर्चून मंदिर
भुकूम ग्रामस्थ उभारणार आठ कोटी खर्चून मंदिर

भुकूम ग्रामस्थ उभारणार आठ कोटी खर्चून मंदिर

sakal_logo
By

भुकूम, ता. १५ : भुकूम (ता. मुळशी) येथील ग्रामदैवत रामेश्वराच्या यात्रेनिमित्त पान फुलाचा कार्यक्रम करण्यात आला. यात्रेचा खर्च वाचवून ग्रामदैवताचे आठ कोटी रुपये खर्चाचे मंदिर बांधण्याचा आराखडा ग्रामस्थांनी तयार केला आहे.
याबाबत नियोजन मंडळाचे माजी सदस्य राजेंद्र हगवणे यांनी सांगितले की, मंदिर जुने झाल्यामुळे नव्याने भव्य मंदिर बांधण्याचा सर्व ग्रामस्थांनी घेतला. त्यासाठी यात्रेची वर्गणी, तसेच परिसरातील व्यावसायिक, भाविक यांच्याकडून देणग्या जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे खर्च वाचविण्यासाठी हा निर्णय घेतला. दरम्यान यावेळी फक्त बैलगाडी स्पर्धा आयोजित केली होती. त्यावेळी मुळशी व मावळ तालुक्यातील शंभर गाड्यांनी सहभाग घेतला. यावेळी शिवन्या विनोद शेलार (ता. मावळ) यांच्या गाड्याने प्रथम क्रमांक मिळविला. त्यांना माजी सभापती स्व. तुकारामबुवा हगवणे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू सुशिल व सशांक हगवणे यांनी दुचाकी बक्षीस दिली. दुसरा क्रमांक योगेश साठे (माण), तिसरा क्रमांक अमृता शितोळे (कासारसाई) यांनी मिळविला.