रिहे खोरे परिसरात भात लावणीस प्रारंभ

रिहे खोरे परिसरात भात लावणीस प्रारंभ

Published on

भुकूम, ता. १० मुळशी तालुक्यात बारमाही पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी भात लावणीस सुरवात केली आहे. त्यांनी मे महिन्यात भात रोपांची पेरणी केली होती, असे पिंपोळी येथील शेतकरी माणिक शिंदे यांनी सांगितले.
मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर जून महिन्यात पेरणी केलेली भात रोपे अद्याप लहान आहेत. पाऊस जून महिन्याच्या अखेरीस सक्रिय झाला. त्यामुळे पेरणी केलेली रोपांची उगवण कमी झाली. अशा रोपांची लावणी करण्यास किमान पंधरा दिवस लागतील.
दरम्यान, बारमाही पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाताच्या पेरणी केल्या होत्या. त्यांची उगवण चांगली झाली आहे, अशा शेतकऱ्यांनी भात लावणीस सुरुवात केली आहे.

01710

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.