कृषी दिनानिमित्त पिरंगुटला वृक्षारोपण

कृषी दिनानिमित्त पिरंगुटला वृक्षारोपण

Published on

भुकूम, ता. १ : पिरंगुट (ता. मुळशी) येथे मुळशी तालुका शेतकरी संघाच्यावतीने वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण करून कृषी दिन साजरा केला. यावेळी एक लाख फळझाडे लागवडीचे उद्दिष्ट संघाने ठेवले आहे.
कृषी दिनानिमित्त कृषी विभाग व पंचायत समितीच्यावतीने तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात केला. यावेळी पीक विमा कंपनी एचडीएफसी ॲग्रोच्यावतीने शेतकऱ्यांनी शेती विषयक उपयोगी वस्तू भेट दिल्या. कृषी विभाग व शेतकरी संघाच्या सहकार्याने यावर्षी तालुक्यात केशर, हापूस, नारळ, जांभूळ, चिकू फळझाडांची पंचवीस हजार रोपे देण्यात आली. तसेच शेतकऱ्यांनी बांबू लागवडीस पुढाकार घ्यावा. कमी वर्षात, कमी खर्चात व कष्टात अधिक उत्पन्न मिळते. तसेच शासनाचे अनुदान मिळते त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांनी केले. दरम्यान, शेतकरी संघाच्यावतीने दर्जेदार रोपे योग्य किमतीत देण्याचे नियोजन केले आहे, असे संघाचे कार्याध्यक्ष भाऊ केदारी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.