मुळशीतील शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ
भुकूम, ता. २६ : मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक समस्यांमुळे यंदा पीक विमा घेण्याकडे पाठ फिरवली आहे. मागील दोन वर्षाच्या तुलनेत ३६९ शेतकऱ्यांनी विम्याचे प्रस्ताव दाखल केले आहेत.प्रधान पीक विमा योजने अंतर्गत खरीप हंगामातील पीक विमा घेण्याची ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ केली आहे.
तालुक्यात २०२३ मध्ये ५४४८ तर २०२४ मध्ये १८४२ जणांनी अर्ज दाखल दाखल केले होते. एक रूपात पीक विमा होता त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केले होते. दरम्यान, पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी कंपन्या साथ देत नाहीत. फोनही उचलले जात नाहीत. अनेक खेपा मारूनही संबंधित अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देतात. नुकसान होऊनही रक्कम मिळत नाही. अतिशय त्रास सहन करावा लागतो, असे लव्हार्डे येथील शेतकरी अशोक चवले यांनी सांगितले.
पिकांचे नुकसान होऊनही विम्याची रक्कम मिळण्यास आंदोलने करावी लागली. तालुक्यात विमा कंपनीचा एकही अधिकारी नसतो. विमा मिळण्यासाठी खूप जाचक अटी आहेत, असे शेतकरी संघाचे उपाध्यक्ष भाऊ केदारी व राम गायकवाड यांनी सांगितले.
शासनाने नवीन सुरू केलेली पीक विमा योजना चांगली आहे. प्रत्तेक मंडळात आत्तापर्यंतच्या उत्पादन सरासरीत फरक पडला तरी नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. तसेच निसर्गाकडून कधीही नुकसान होऊ शकते. त्यामुळे सुरक्षतेसाठी शेतकऱ्यांनी पीक विमा घेणे आवश्यक आहे,असे तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.