पुणे
भाताच्या पंचनाम्यास मुळशीमध्ये सुरुवात
भुकूम : मुळशी तालुक्यातील नुकसान झालेल्या भात पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी संबंधित आधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे तहसीलदार विजयकुमार चौबे यांनी सांगितले होते.
तालुक्यात सततच्या पावसामुळे, ढगाळ हवामानामुळे अद्याप भात काढणी करता आली नाही. तसेच पाऊस व वारे यामुळे रोपे खाचरात पडली. अशा पिकांची पंचनामे करण्यात येत आहे. तसेच मूळकूज व डिंक्या रोगामुळे नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे करण्यात येत आहे. संबंधित मंडल अधिकारी व तलाठी यांच्याशी संपर्क करावा, असे तहसीलदार कार्यालयाने कळविले आहे.
याबाबत आमदार शंकर मांडेकर म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तशी सूचना केली आहे. त्याप्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात येत आहे.

