थोर सुधारकांच्या विचारांचा जागर व्हावा ः गलांडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थोर सुधारकांच्या विचारांचा जागर व्हावा ः गलांडे
थोर सुधारकांच्या विचारांचा जागर व्हावा ः गलांडे

थोर सुधारकांच्या विचारांचा जागर व्हावा ः गलांडे

sakal_logo
By

भिगवण, ता. ४ ः ‘थोर समाज सुधारकांनी विचारांचा अनमोल ठेवा दिला आहे. जयंती, पुण्यतिथी साजरी करीत असताना वाद्यांचा गजर केला जातो, परंतु समाज सुधारकांचा विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल, तर त्यासाठी वाद्यांचा गजर करण्यापेक्षा विचारांचा जागर करण्याची आवश्यकता आहे. सावित्रीबाई फुले यांनी संघर्षातुन स्त्री शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविली. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा जागर होण्याची आवश्यकता आहे,’ असे प्रतिपादन व्याख्याते सुहास गलांडे यांनी केले.

येथील कला महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज होते, तर मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा लामुतरे, प्रा. पद्माकर गाडेकर, डॉ. प्रशांत चवरे, प्रा. कविता देवकाते, प्रा. शाम सातर्ले, प्रा. धनाजी मत्रे, प्रा. नीलेश जाधव, प्रा. रणजित इनामके उपस्थित होते.

गलांडे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. प्रतिकुल परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत कायम तेवत ठेवली. सध्या स्त्रिया सर्वच क्षेत्रामध्ये यशाची शिखरे पादाक्रांत करत आहेत. स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी घेतलेल्या परिश्रमाचेच हे फळ आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महादेव वाळुंज, शबाना मदारी, निकिता जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक डॉ. सुरेंद्र शिरसट यांनी, तर आभार भाऊसाहेब सकुंडे यांनी मानले.
------------------------------