भिगवणमध्ये शेतकऱ्यांना मूरघास बॅगेचे वाटप
भिगवण, ता. २०: ‘‘ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे. ही महाराष्ट्र बॅंकेची सातत्याने भूमिका राहिली आहे. बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा, महाबॅंक ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. बॅंक ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्र आहे,’’ असे प्रतिपादन येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेचे शाखाधिकारी राम चव्हाण यांनी केले.
भिगवण (ता. इंदापूर) येथील महाराष्ट्र बॅंकेच्या ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त महाबॅंक ग्रामीण विकास केंद्रामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी यावेळी येथील शाखेचे व्यवस्थापक राम चव्हाण, प्रभारी अधिकारी उमेश निकम, डॉ. सचिन वणवे देवा फलफले, अनिता ताटे यांचे उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. बॅंकेच्या ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना चारा साठवणीसाठी उपुयक्त एक टन चारा साठवण क्षमतेच्या दोन मूरघास साठवण बॅगा भेट देण्यात आला. यावेळी डॉ. वणवे यांचे मुरघास व्यवस्थापन या विषायवर व्याख्यान झाले. तसेच शाखाधिकारी राम चव्हाण यांनी विविध कर्ज योजनांबद्दल माहिती दिली. तर प्रभारी अधिकारी उमेश निकम यांनी ग्रामीण विकास केंद्रामार्फत राबविल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
देवा फलफले यांनी सूत्रसंचालन तर पी.व्ही लकडे यांनी आभार मानले.
01235