भिगवण ट्रॉमा केअर सेंटर ‘कोमात’

भिगवण ट्रॉमा केअर सेंटर ‘कोमात’

Published on

प्रा. प्रशांत चवरे
भिगवण, ता.११ : राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्यानंतर कोमात गेलेल्या रुग्णांना मदत मिळावी या उद्देशाने भिगवण (ता. इंदापूर) येथे पाच वर्षांपूर्वी उद्‌घाटन झालेल्या ट्रॉमा केअर सेंटरच कोमात गेल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. तर येथील ग्रामीण रुग्णालयही ‘आजरी’च असल्याने रुग्णांना नाहक खासगी रुग्णालयाची पायरी चढावी लागत आहे.
पुणे-सोलापूर व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेल्या भिगवण गावांमध्ये ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरच्या उभारणीनंतर तीन जिल्ह्यातील नागरिकांसह राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांनाही येथे सेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती; परंतु अद्यापपर्यंत येथील ट्रॉमा केअर सेंटर पूर्ण क्षमतेचे सुरू झालेले नाही. मागील तीन वर्षांपासून या ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीमध्ये पोलिस ठाण्याचाच कारभार सुरू आहे. गंभीर रुग्णांवर शस्त्रक्रिया व्हावी या हेतुने बांधण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये सध्या पोलिस आरोपींचीच शस्त्रक्रिया करत असल्याची स्थिती आहे. तर सध्या सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयाची स्थितीही आजारी रुग्णासारखीच आहे. येथील ग्रामीण रुग्णालयातील सुमारे ६० टक्के कर्मचारी कंत्राटी स्वरूपाचे आहेत. त्यामुळे रुग्णालयाचा बराच भार कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच आहे.

या आहेत समस्या
पावसाळ्यामध्ये ग्रामीण रुग्णालयास तळ्याचे स्वरूप येते
बऱ्याचदा पावसाचे पाणी रुग्णालयामध्ये शिरल्यामुळे रुग्णांनाच रुग्णालयात जात येत नाही
औषधांचा पुरवठाही अनियमित
कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या वसाहतीचीही दुरवस्था
नियमित भुल तज्ज्ञ नाही
भुलतज्ज्ञाअभावी केवळ नियमित प्रसूतीच करणे शक्य आहे.
गंभीर व सिझेरियनसाठी रुग्णांना बारामती गाठावी लागते

अपघातग्रस्त रुग्णांवर येथील ग्रामीण रुग्णालयामध्येच उपचार करण्यात येतात. सोनोग्राफीचीही व्यवस्था येथे आहे. भुल तज्ज्ञांची मागणी प्रशासनाकडे केली आहे त्याच्या पूर्ततेनंतर येथे सर्व प्रकारच्या प्रसूती करणे शक्य होणार आहे. विद्यमान व्यवस्थेमध्ये रुग्णांवर आवश्यक ते उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
- डॉ. अनिकेत लोखंडे, अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, भिगवण (ता. इंदापूर)

01282

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com