‘जीवन गौरव’ने बोगावत, ‘भिगवण भूषण’ने काळे सन्मानित
भिगवण, ता. २३ : येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ‘आदर्श जीवन गौरव’ पुरस्कार सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात अग्रेसर असलेले प्रकाश दीपचंद बोगावत यांना, राष्ट्रपती पदक विजेते पोलिस उपनिरीक्षक अनिल काळे यांना ‘आदर्श भिगवण’ पुरस्कार तर मुख्याध्यापिका सुचेता साळुंखे व मुख्याध्यापिका पल्लवी वाघ यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भिगवण (ता. इंदापूर) येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या आदर्श शैक्षणिक संकुलामध्ये आदर्श पुरस्कार वितरण व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी जिल्हा परिषद सदस्या प्रमिला जाधव, सरपंच गुरप्पा पवार, उपसरपंच कपिल भाकरे, गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी, केंद्रप्रमुख शशिकांत गावडे, भिगवण रोटरी क्लबचे अध्यक्ष निखिल बोगावत, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत खानावरे, अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे, रवींद्र वांझखडे, अजिंक्य मांडगे, नानासाहेब बंडगर, बापूराव थोरात, सीमा काळंगे, हेमा माडगे, ॲड .स्वाती गिरंजे उपस्थित होते. यावेळी
पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी सचिन बोगावत, अनिल काळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ.अमित खानावरे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते. प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत खानावरे यांनी तर अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे यांनी आभार मानले.
1312

