
केळकर, सातपुते, निकम यांचा भोर हेल्थ फाउंडेशनकडून गौरव
भोर, ता. ९ : भोर हेल्थ फाउंडेशनच्या वतीने टिटेघर (ता. भोर) येथील ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांना शुभांगद जीवन गौरव पुरस्कार, सुहासिनी सातपुते यांना आरोग्यसेवा जीवन पुरस्कार आणि हेमा निकम यांना सर्वोत्तम आरोग्य सेवक पुरस्कार प्रदान केला.
दिवंगत शुभांगद सुरेश गोरेगावकर यांच्या १५व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी महाड येथील जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अजय जोगळेकर, भोर हेल्थ फाउंडेशनचे डॉ. सुरेश गोरेगावकर, डॉ. प्रदीप पाटील, फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव, भोर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रमोद गुजर, सचिव विकास मांढरे, रचनाकार रोहन गोरेगावकर, डॉ. विजय गोरेगावकर, के. डी. भोर, डॉ. अमर भोर, डॉ. दीपक ताटे, अनिल गोरेगावकर, मनीषा केळकर व डॉ. प्रमोद दिवार आदी उपस्थित होते. सीमा मुकादम व डॉ. संगीता खोकले यांनी सूत्रसंचालन केले.